Supriya Sule | शिंदे-फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी – सुप्रिया सुळे

Supriya Sule | नवी दिल्ली : आज लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिवसेनेची (Shinde group) भूमिका होती. परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण नको असे म्हणाले. नेमकी धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

धनगर समाजाशी खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. शिंदे-फडणवीस सरकार धनगरांची फसवणूक करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे भाजपाने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

आम्ही कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करत नसून ते तसेच राहिले पाहिजे. इतरांना वेगळे आरक्षण देण्यात यावे, अशीच भूमिका आमच्या महाविकास आघाडीची आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.