बारामती देशात अव्वल म्हणूनचं सर्वांना हवीहवीशी- सुप्रिया सुळे

2024 मध्ये बारामतीत देखील भाजपचा उमेदवार विजयी होईल असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती देशात अव्वल आहे, म्हणून ती सर्वांना हवीहवीशी वाटते, आणि त्याचा मला अभिमान आहे.

औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी आर्थिक मंदीवर आपले मत मांडले. शिवस्वराज्य यात्रेत भगवा झेंडा घेण्यावरून राष्ट्रवादीवर होत असलेल्या टिकेला देखील  भगवा झेंडा कुणाची मक्तेदारी नाही’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले. आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी विकासाच्या मुद्यावरच लढणार आहे, कारण सध्या विकास सोडून सगळं सुरू असल्याचा टोला देखील त्यांनी भाजप सरकारला लगावला.

राज्यात आणि देशात आर्थिक मंदीचा परिणाम आहेच, ते नाकारून चालणार नाही. माझ्या बारामती मतदारसंघातील अनेक कंपन्यामध्ये कामगार कपात सुरू आहे. मला भेटायला येणाऱ्या शंभर पैकी बहुतांश सुशिक्षित बेरोजगार आहेत असे सांगत ओला, उबेर मुळे वाहनांची विक्री घटली आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आली हे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे विधान धक्कादायक असल्याची टिकाही खासदार सुळे यांनी केली.

Loading...

त्या म्हणाल्या, उद्योजकांकाडून प्रसिध्द करण्यात येणाऱ्या सीमच्या अहवालात सत्तर वर्षात एवढी मंदी आली नाही असा उल्लेख करण्यात आला आहे. स्टील, सिमेंट, सर्व्हिस इंडस्ट्रीज या सगळ्याच क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण आहे. नोटबंदी, जीएसटीच्या निर्णयाचे परिणाम खऱ्या अर्थाने आता दिसायला लागले आहेत. आर्थिक मंदीमुळे जी काही माहिती समोर येत आहे, त्यातील आकडेवारी ही सरकारी आहेत. भविष्यात बेरोजगारीचा गंभीर विषय आमच्यासाठी आव्हान असेल हे सरकारनेच मान्य केले आहे. सरकारला व्हिजन नसल्याचा हा परिणाम असल्याचे सुळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.