InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘स्वत:चा पाय तुटला म्हणजे दुसरा माणूस लंगडा व्हावा. ही आमची जात नाही’

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर बहुप्रतीक्षीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर भाषण केले. “राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही मलाही वाईट वाटले,” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“राज्यात सत्तास्थापनेचे नाटक सुरु होतं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळे यांचा चेहरा मी बघितला. त्यांच्या डोळ्यातील अश्रूही मी पाहिले. मला ते बघून हसू आले नाही. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. मला वाईट वाटलं. आपला 80 वर्षांचा बाप लढा दिल्यानंतर त्यांच्या पक्षात फूट पडते का? आपल घर फुटतयं की काय? ही वेदना एका मुलीच्या चेहऱ्यावरची मी भोगलेली आहे.” असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Loading...

“स्वत:चा पाय तुटला म्हणजे दुसरा माणूस लंगडा व्हावा. ही आमची जात नाही. आम्ही असा विचार करत नाही. माझ्या डोळ्यातले अश्रू मी सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाहिले. यानंतर मी माझ्या कॉमन मित्राला म्हणाले. मला फार वाईट वाटलं.” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.