InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी, तर सुनील तटकरे उपगटनेतेपदी

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली असून खासदार सुनील तटकरेंकडे उपगटनेतेपद सोपवण्यात आले आहे. तर पक्षाने चिफ व्हिप म्हणून लक्षद्वीपचे एकमेव खासदार मोहम्मद पी.पी. फैजल यांची निवड केली. 

या निवडीबाबत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. सुनील तटकरे यांनी ट्वीट करून या निवडीची माहिती देताना म्हटले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझी लोकसभेत उपगटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आदरणीय खा. शरद पवार साहेबांचे मनःपूर्वक आभार! या संधीचा मी आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व लोकांच्या हितासाठी पूर्ण उपयोग करेन.”

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply