दरेकरांच्या त्या टीकेला सुरेखा पुणेकरांचं प्रत्युत्तर; दिला गंभीर इशारा

मुंबई : लावणी सम्राज्ञी आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पक्ष प्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला होता. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला होता.

“या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती. यानंतर दरेकर यांच्या विरोधात महिला राष्टवादी आक्रमक झाली होती. दरेकरांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाल्या. यानंतर आता यावर खुद्द सुरेखा पुणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नसुन महिलांचा आदर करणारा पक्ष आहे, असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे. दरेकरांना जर महिलांचा आदर करता येत नसेल तर त्यांनी कमीत- कमी महिलांचा अपमान तरी करू नये, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत. त्यासोबतच प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी नाहीतर महिला शांत बसणार नाहीत, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा