InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

याआधीही भारतीय लष्कराने सीमा ओलांडून कारवाया केल्या आहेत – डी. एस. हुडा

सर्जिकल स्ट्राइकवरून काँग्रेस आणि भाजपकडून अनेक दावे केले जात आहेत. काँग्रेसने याआधीही सर्जिकल स्ट्राइक केले होते असे म्हटले होते. यावर काँग्रेसने केवळ गेममध्येच सर्जिकल स्ट्राइक केले असे म्हटले होते.

आता सर्जिकल स्ट्राइकवर, 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी भाष्य केले आहे. याआधीही सीमा पार जाऊन कारवाई करण्यात आल्या होत्या असे हुडा म्हणाले आहेत.

‘भारतीय लष्करानं याआधीही सीमा ओलांडून कारवाया केल्या आहेत. मात्र त्या नेमक्या कुठे आणि कधी केल्या याची मला कल्पना नाही. लष्कराच्या कामाचं राजकारण करणं अयोग्य असल्याचंदेखील हुडा यांनी जयपूरमध्ये पत्रकारांना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply