InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आज सुरिंदर नाडा करणार मोठा विक्रम

- Advertisement -

प्रो कबड्डीमधील हरयाणा स्टीलर्स संघाचा कर्णधार सुरिंदर नाडा आज जेव्हा यु मुंबा विरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा त्याला एक विक्रम खुणावत असणारा आहे. सुरिंदर नाडा याच्या नावावर सध्या प्रो कबड्डीमध्ये ६५ सामन्यांमध्ये २१८ गुण आहेत. त्यात त्याने १७ गुण रेडींग मिळवले आहेत तर १९९ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत.

या सामन्यांमध्ये त्याने डिफेन्समध्ये एक जरी गुण मिळवला तरी तो डिफेन्समध्ये २०० गुण मिळवणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होणार आहे. सुरिंदरचा या मोसमातील डिफेन्समधील फॉर्म खूपच चांगला राहिला आहे. त्याने या मोसमात खेळताना १६ सामन्यात ६२ गुण मिळवले आहेत. त्यातील ६१ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत तर १ गुण रेडींगमध्ये मिळवला आहे. या मोसमात डिफेन्समध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसरऱ्या स्थानावर आहे.

मागील काही सामन्यातील त्याचा खेळ पाहता तो या सामन्यात देखील डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी करेल आणि २०० गुण मिळवणाऱ्या यादीत स्वतःचे नाव नोंदवेल. त्याचबरोबर जर त्याने या सामन्यात हाय फाईव्ह मिळवला तर तो या मोसमात डिफेन्समध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू बनेल. हरयाणा संघातील खेळाडू आणि सुरिंदरचा जोडीदार मोहीत चिल्लर यांच्या नावर देखील डिफेन्समधील २०० गुण आहेत.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-

- Advertisement -

# प्रो कबड्डीमध्ये डिफेन्समध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण फक्त तीन खेळाडूंनी मिळवले आहेत.
१ मंजीत चिल्लर (२३० गुण), २ मोहीत चिल्लर (२०५), ३ संदीप नरवाल (२००)

# सुरिंदर नाडाने या मोसमात हरयाणाच्या सुरुवातीच्या पाच सामन्यात सलग पाच हाय फाईव्ह मिळवत विक्रम केला होता.

# मागील सामन्यात हाय फाईव्ह मिळवत सुरिंदरने प्रो कबड्डीमध्ये एका मोसमात सर्वाधिक ७ हाय फाईव्ह मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता.

# आजच्या सामन्यात जर सुरिंदर नाडाने डिफेन्समध्ये १ जरी गुण मिळवला तर हरयाणा स्टीलर्स हा एकमेव संघ होईल की ज्यांच्या दोन खेळाडूंनी डिफेन्समध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.