मुंबई सोडून कोणत्याही संघाने अर्जुनमध्ये रस दाखविला नाही हे आश्चर्यकारक !

मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामासाठीच्या लिलावाची तयारी सुरू झाली आहे. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अनेकदा आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या सराव सत्रात दिसतो. अर्जुन मुंबईसाठी नेट गोलंदाज म्हणून असतो. भारतीय संघासाठी त्याने नेट गोलंदाजी केली आहे. आता आयपीएल २०२१ मध्ये अर्जुन खेळताना दिसणार आहे.

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात मुख्य आकर्षणांपैकी एक होता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, कोणता संघ त्याच्यासाठी बोली लावणार यावरुन सोशल मीडियात आधीच अनेक तर्क लढवले जात होते. अखेर सचिन तेंडूलकरप्रमाणे त्याचा मुलगाही मुंबई इंडियन्ससाठीच खेळणार आहे.

अर्जुन तेंडूलकरची बेस प्राईज 20 लाख रुपये ठेवण्यात आली होती, मुंबई इंडियन्सनं त्याला त्याच्या बेस प्राईजवरच विकत घेतलं. अर्थात मुंबईकडून खेळण्यासाठी त्याला 20 लाख रुपये मिळणार आहेत. सोशल मीडियावर यावरुन आता चर्चांना एकच उधाण आलं आहे.

अर्जुन तेंडुलकरचं नाव आयपीएलच्या लिलावात आलं तेव्हाच मुंबई इंडियन्स त्याच्यावर बोली लावणार असा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे मुंबई इंडियन्सले २० लाखांच्या मूळ किंमतीत अर्जुन तेंडुलकरला संघात घेतलं आहे.आश्चर्य म्हणजे मुंबईशिवाय इतर कोणत्याही संघाने अर्जुनमध्ये रस दाखविला नाही त्यामुळे तो मुंबईच्या संघाचा भाग बनणार हे निश्चित होतं असं म्हटलं तर काही गैर ठरणार नाही.

दरम्यान, सचिन तेंडूलकरप्रमाणे अर्जुनला मुंबई इंडियन्स विकत घेईल, असा सूर नेटकऱ्यांमध्ये पहायला मिळत होता, अखेर तो खरा ठरला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरसोबत आता अर्जुन तेंडुलकरलाही ट्रोल केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा