Suryakumar Yadav | सूर्यकुमारच्या बॅटिंगवर ग्लेन मॅक्सवेलने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने यावर्षी अनेक विक्रम मोडले आहे. भारतीय संघातील उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू टी-20 मध्ये नंबर-1 क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) याने नुकतेच सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आहे. मॅक्सवेल म्हणाला आहे की, “सूर्यकुमार यादव एक उत्कृष्ट आणि वेगळी फलंदाजी करत आहे.”

सूर्यकुमार यादवने 51 चेंडूमध्ये 151 धावांची नावात खेळी खेळली होती. या खेळीचा आधार घेत ग्लेन मॅक्सवेलने सूर्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमारच्या या खेळीमुळे भारताने न्युझीलँड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यांमध्ये 65 धावांनी विजय मिळवला होता. विराट कोहलीने सूर्याच्या खेळीला व्हिडिओ-गेम-इनिंग म्हणून संबोधले होते.

ग्लेन मॅक्सवेल पुढे सूर्यकुमारचे कौतुक करत म्हणाला की, “मी पहिल्या डावातील स्कोर बोर्ड पाहिले आणि त्याचा स्क्रीन शॉट घेऊन थेट फ्रिंचला पाठवला आणि त्याला मी म्हणालो इथे काय चालले आहे? हा माणूस वेगळ्या ग्रहावर फलंदाजी करत आहे. मी त्याला म्हणालो की स्कोर बघ आणि या माणसाकडे बघ.” पुढे मॅक्सवेल म्हणाला की,”मी दुसऱ्या दिवशी पुन्हा या सामन्याचा रिप्ले पाहिला. ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की सूर्य हा इतरांपेक्षा खूप चांगला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे खेळण्यासाठी एक वेगळी प्रतिभा आहे.”

संथ खेळपट्टीवर जवळपास सर्वच फलंदाजांना खेळणे अवघड जाते. अशा परिस्थितीत टॉप ऑर्डरचा टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव 217.65 च्या स्ट्राईकरेटने खेळत होता. त्याने 14 चौकार आणि 7 षटकारांसह टी-20 मध्ये आपले दुसरे शतक झळकावले. त्याने सोळाव्या षतकामध्ये शेवटी 35 चेंडू मध्ये 57 धावा केल्या होत्या. तर सूर्यने शेवटच्या सोळा चेंडू 54 धावा करत भारतीय संघाला 191/6 या धावसंख्येपर्यंत नेले होते. या सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडला 18.5 षटकांमध्ये 126 धावांवर रोखले होते. यावर ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की,”सूर्यकुमार वेगवेगळ्या पद्धतीने शॉर्ट खेळत होता, काही वेळा तो शॉर्ट बॅटच्या मध्यभागी मारत होता. तर कधी पाऊल पुढे टाकून विकेटच्या दुसऱ्या बाजूने शॉट मारत होता.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.