Suryakumar Yadav । सूर्यकुमार यादव याबाबतीत मोहम्मद रिझवानच्याही पुढे

Suryakumar Yadav । मुंबई : सूर्यकुमार यादव याने भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पदार्पणापासूनच त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. त्याने या वर्षी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. रिझवानने या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या.

पण आता या यादीत सूर्यकुमार यादवचा समावेश झाला आहे. यावर्षी त्याने 25 T20 सामन्यांमध्ये 867 धावा केल्या आहेत. रिझवानने 20 सामन्यात 839 धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकाच्या दोन सामन्यांत रिझवान फ्लॉप ठरला आहे. पण यादवने चांगली खेळ करत अर्धशतक ठोकले आहे. त्याची कामगिरी पाहून रवी शास्त्रींना कसोटी संघात आणण्याची मागणी केली.

स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात सूर्यकुमार बाबत बोलताना शास्त्री म्हणाले कि, मला वाटते की तो तीन फॉरमॅटचा खेळाडू आहे. तो कसोटी क्रिकेट खेळू शकतो. मी तुम्हाला सांगेन की तो काही लोकांना आश्चर्यचकित करू शकतो. सूर्यकुमारला पाचव्या क्रमांकावर खेळायला पाठवा आणि त्याला खेळू द्या.

सूर्यकुमार बऱ्याच काळापासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपली क्षमता सिद्ध करत आहे आणि अखेरीस त्याला 2021 मध्ये संधी मिळाली. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी अर्धशतक झळकावले. टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याची फलंदाजी पाहण्यासारखी आहे. तो सतत वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात यशस्वीही होतो.

महत्वाच्या बातम्याः

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.