सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नवं वळण; अभिनेते नितीश भारद्वाज यांनी केला मोठा खुलासा 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. रिया चक्रवर्तीने NCB ला दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री सारा अली खानदेखील तिला ड्रग्ज पुरवण्यात मदत करत असल्याचे सांगितले आहे. तसेच ते दोघे ‘केदारनाथ’ च्या शूट दरम्यान ड्रग्ज घेत असल्याचे रियाने सांगितले. यावर आता केदारनाथमध्ये साराच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

नुकतीच नितीश भारद्वाज यांनी एक मुलाखात दिली. यावेळी नितीश म्हटले, की ‘‘केदारनाथच्या सेटवर अभिनेत्री पूजा गौर आणि माझ मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या गोष्टींवर बोलणं सुरु होतं. बोलता बोलता आमच्यामध्ये ड्रग्सच्या मुद्द्यावरसुद्धा बोलन झालं. तेव्हा सारा आम्हाला म्हणाली की, ‘मी सुद्धा चित्रपटसृष्टीतील ड्रग्सच्या प्रभावाबद्दल ऐकलं आहे. यावर मी साराला स्पष्ट शब्दांत सांगितल होतं, की तू अशा गोष्टींपासून नेहमी दूर राहा.” असे मुलाखतीमध्ये नितीश म्हंटले

पुढे ते असेही बोलले की, ” सुशांतबद्दल सांगायचं तर तो स्मोक करत होता. मात्र ते ड्रग्स नव्हते. मी जरी सिगारेट किंवा ड्रिंकपासून दूर असलो, तरी ड्रग्स, सिगारेट आणि साधी सिगार यातील फरक मला समजतो. त्याचा वासदेखील नॉर्मलच होता’. तसेच सेटवर सारा आणि सुशांत नेहमीच सक्रीय असायचे आणि नॉर्मलदेखील असायचे. ड्रग्स घेणारे लोक इतके नॉर्मल असूचं शकत नाही असं मला वाटत.” असं मत नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा