सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : पुरावे देऊनही मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना अटक नाही : नारायण राणे

सिंधुदुर्ग : राणे विरुद्ध शिवसेना हा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. अशातच आता सिंधुदुर्ग येथे बोलत असताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. “सुशांतसिंग राजपूत, दिशा सालीयान मृत्यू प्रखरणी आम्ही पुरावे देऊनही मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्याने अटक करण्यात आली नाही,” असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

अभिनेता सुशात सिंग राजपूत, दिशा सालीयान यांच्या आत्महत्या नसबन त्यांचे खून झाले आहेत आणि त्याचे पुरावे दिले, मात्र राज्य सरकारने कोणावरही कारवाई केली नाही, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्यामुळे त्यांना अटक केली नाही असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सावंतवाडीत कार्यकर्त्यांशी चर्चा करताना नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून गंभीर आरोप केले.

सुशांत कलावंत, घरात हत्या झाली, सांगितले आत्महत्या केली. काय गरज होती त्याला आत्महत्या करायची? आम्ही अनेक पुरावे दिले, मी दिले. त्या रात्री काही लोक गेले त्याच्या घरी, ते बोलत असताना तो उलट बोलला. दिशा सॅलियनची हत्या याच लोकांनी केली होती. तो बोलला मी ते विसरू शकत नाही. कारण दिशा सॅलियन त्याची मैत्रीण होती. तिला आठव्या माळ्यावरून फेकले खाली. अत्याचार केला चार पाच जणांनी. त्यामुळे तो म्हणाला मी हे माफ करणार नाही. त्यामुळे ते चिडले आणि त्याला बाथरुममध्ये ठार मारले. आम्ही सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, अटक नाही. दिशा सॅलियन हत्या, कुणाला अटक नाही, असे नारायण राणे म्हणाले.

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा