ड्रग्स प्रकरणात अटक झालेला सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने लग्नसाठी केला जामीन अर्ज

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी व ड्रग्स प्रकरणी अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. याच संदर्भात गेल्या महिन्यात सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने अटक केली  होती. आता सिद्धार्थ पिठानीने कोर्टात जामीन अर्ज दाखल केला आहे.

माहितीनुसार सिद्धार्थचे वकील तारक सईद यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. सिद्धार्थकडून करण्यात आलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, त्याचे लग्न २६ जूनला हैदराबादमध्ये होणार होते. त्यामुळे सिद्धार्थाने कोर्टात लग्नाची पत्रिका जमा केली असून लग्नासाठी जामीनाची मागणी केली आहे. पण अलीकडेच सिद्धार्थ लग्न केले होते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान याप्रकरणाची कोर्टाने सुनावणी १६ जूनपर्यंत ढकलण्यात आली आहे.

गेल्या वर्षी १४ जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्र्यातील आपल्या घरात आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीची सुरुवात झाली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा