Sushma Andhare | “…असं म्हणून दादा आम्हाला परकं करू नका” ; अजित पवारांच्या टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
Sushma Andhare | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निर्णय दिला. 16 अपात्र आमदारांचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. राज्यातील राजकीय वर्तुळातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. याबाबत अजित पवार यांनी देखील मत व्यक्त केलं आहे. याबद्दल बोलत असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. अजित पवारांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात त्यांच्यासमोर रडायला पाहिजे होतं, अशा शब्दात अजित पवारांनी अंधारेंवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देत सुषमा अंधारे म्हणाल्या, “अजित दादा खूप मोठे नेते आहे. ज्या कार्यक्रमामध्ये मी भावुक झाले होते, तो पूर्णपणे राजकीय कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये दादांच्या नावाचा उल्लेख मी केला नव्हता. दादा तुम्ही आमच्या हक्काचे आहात. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे हक्काने बोलतो. त्यामुळे असं बोलून तुम्ही आम्हाला परकं करू नका.”
पुढे बोलताना त्या (Sushma Andhare) म्हणाल्या, “अजितदादा महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही तुम्हाला अत्यंत हक्काचं आणि आपुलकीचं मानतो. मी पुन्हा एकदा सांगते दादा तुमच्या नावाचा त्या दिवशी उल्लेख नव्हता.”
दरम्यान, सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांसमोर सुषमा अंधारे (Sushma Andhare) भावुक झाल्या होत्या. विरोधी पक्षाने सुषमा अंधारेंवर टीका केली होती तेव्हा विरोधी पक्षाने त्याची दखल घेतली नव्हती, असं म्हणतं अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले, “सुषमा अंधारे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आहेत. पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा, त्या ज्या पक्षाचं काम बघतात ज्या पक्षासाठी बाबारे- काकारे-मामारे करतात आणि आणि सभा घेत आहेत. त्यांच्यासमोर भावनिक व्हावं.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | जयंत पाटलांच्या ईडीच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले तेव्हापासून आमचा कॉन्टॅक्ट ….
- Rishi Sunak – मराठी तरुणाने लिहिले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पुस्तक
- Nitesh Rane | संजय राऊतांना अजून अक्कलदाड आली नाही; नितेश राणेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र
- Chitra wagh | पाटलांच्या इशा-यावरून बावळटबाई, नाचxxx; घुंगरू वाजवू नका…तमाशा चालणार नाही – चित्रा वाघ
- Anil Parab । सुनील प्रभू यांचाच व्हिप सर्वांना लागू होणार ;अनिल परबांचा दावा
Comments are closed.