Sushma Andhare | आता त्यांचं सदस्यत्व रद्द होईल; सुषमा अंधारेंचा मनीषा कायंदेंवर पलटवार

Sushma Andhare | मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावरूनच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनीषा कायंदेंवर निशाणा साधला आहे. मनीषा कायंदे यांचं सदस्यत्व रद्द होईल, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Action will be taken against Manisha Kayande as per anti-party action – Sushma Andhare

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मनीषा कायंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, “पक्षविरोधी कारवाईनुसार त्यांच्यावर कारवाई होईल. विधान परिषदेतील सदस्य स्वतःहून गेले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होतं. त्याचबरोबर पक्षातून एखाद्या नेत्याच्या हकलपट्टी झाली तर ते सदस्यत्व राहतं. मनीषा कायंदे यांनी स्वतःहून पक्ष सोडला आहे. त्यामुळं त्यांचं सदस्यत्व रद्द होईल.”

पुढे बोलताना त्या (Sushma Andhare) म्हणाल्या, “मला ब्लॅकमेल केलं जात आहे, असं त्यांनी मला सांगितलं होतं. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं, कर नाही त्याला डर कशाला. जर तुमची चूक नसेल, तर तुम्ही घाबरायचं काही कारण नाही, असं आम्ही त्यांना सांगितलं होतं.”

दरम्यान, मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत असताना उद्धव ठाकरे गटावर टीका केली होती. “ठाकरे गटामध्ये माझ्यासारख्या सीनियर नेत्यावर ज्युनिअर नेते हुकूम गाजवत होते. त्याचबरोबर पक्षात माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात होतं. मला अनेक विकास काम करायची होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी मला कधीच संधी दिली नाही.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/sushma-andhare-said-that-the-membership-of-manisha-kayande-will-be-cancelled/?feed_id=45253