Sushma Andhare | “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू…”, सुषमा अंधारे संतापल्या

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या प्रबोधन यात्रेनिमित्ताने आज नाशिकमध्ये आल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कुचुंबावर घणाघात केला आहे. यावेळी त्यांनी नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत, नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत, तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचं खंडनमंडन करावं लागतं, राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे, मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, असा घणाघात अंधारे यांनी केला आहे.

यादरम्यान, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहेत, ते गृहमंत्र्यासारखे वागत नाहीत, एकाच पक्षाचे असल्या सारखे वागतात, एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. मात्र काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही, असा आरोप अंधारेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

दरम्यान, सगळी खाते फडणवीस यांच्याकडे आहेत. याचा अर्थ भाजपच्या इतर लोकांना अक्कल नाही का? असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहेत का? असा सवालही त्यांनी केला. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत, असा देखील आरोप अंधारेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.