Sushma Andhare | “आमचं लई ओपन…”; उमेदवारीबद्दल सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

Sushma Andhare | मुंबई : मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही नेत्यांनी पक्षविस्तारासाठी काम केले आहे. ठाकरे गटातील फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला.  त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते असा अंदाज लावला जात आहे. याबाबत विचारले असता सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

त्या म्हणाल्या, “आमचं लई ओपन किचन असतंय, आमच्याकडे लेट पण थेट कार्यक्रम असतो. आमच्याकडे कोणी कोणाला सूचना देत नाही. मी वारंवार सांगते की शिवसेना हा केडरबेस पक्ष आहे. पक्षप्रमुखांनी आदेश द्यायचा आणि तो आम्ही पाळायचा असे आहे. त्या-त्या वेळेला आम्हाला आदेश मिळतील. तुर्तास तरी आम्ही संघटनाबांधणीवर काम करत आहोत.”

“मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांनी येऊन विविध विकासकामांचं उद्घाटन करणे, त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी विविध मुद्यावर बोलणे, महाविकास आघाडीवर टीका करणे म्हणजेच हे सगळे प्रयोग भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बोलण्यासारखे आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.