Sushma Andhare | “केंद्र शासनाने कोश्यारी यांच्या रुपाने…”; सुषमा अंधारेंची राज्यपालांवर सडकून टीका
Sushma Andhare | औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केली आहे. यामुळे आता एक नवी वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, “राज्यपालांनी पालक म्हणून काम केले पाहीजे, पण ते सातत्याने वादग्रस्त विधाने करीत आहेत. महाराष्ट्राला कमी लेखण्याचे काम त्यांनी केले आहे. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील त्यांनी असेच विधान केले आहे.” राज्याचे पालक म्हणून काम करण्यापेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणं त्यांना जास्त आवडतं असा टोला अंधारेंनी यावेळी बोलताना लगावला.
केंद्र शासनाने कोश्यारी यांच्या रुपाने महाराष्ट्राची बदनामी करणारा माणूस पाठवला असल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्हाला राज्यपाल हवेत, भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता नको, अशा शब्दात त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय.
काय म्हणालेत भगतसिंह कोश्यारी?
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.” तसेच “शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil | “आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो”; गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये एक चमचा तूप खाऊन ‘या’ आजारांपासून रहा दुर
- Reels | खोट्या बंदुकीसोबत रिल्स बनवणे पडेल महागात; होऊ शकते ५ वर्षाची शिक्षा
- Rohit Pawar | “छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची…”; राज्यपालांच्या विधानावर रोहित पवार संतापले
- Amol Mitkari | “पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि…”; राज्यपालांच्या विधानावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.