Sushma Andhare | टीम देवेंद्रचा शिंदे गटातील आमदारांना खिंडीत पकडून संपवण्याचा डाव – सुषमा अंधारे

Sushma Andhare | औरंगाबाद : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघात केला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रा (Maha Prabhodhan Yatra) सध्या औरंगाबादेत दाखल झाली आहे. पुढील तीन दिवस ठिकठिकाणी त्यांच्या सभा होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “टीम देवेंद्र शिंदे गटातील एका-एका आमदारांना खिंडीत पकडून संपवण्याचा डाव करत आहे. त्यांना बदनाम करत आहे आणि त्यांचे जाणीवपूर्वीक खच्चिकरण करत आहे. याचे उदाहरण म्हणजे रवी राणा जाहीररीत्या सांगतात. की आम्ही काही बच्चू कडू सारखे खोके घेऊन गुवाहटीला जाणारे लोक नाही आहोत. याचा अर्थ बच्चू कडू यांच्यासारख्या चांगल्या आमदाराची विश्वासहार्यता ते धोक्यात आणतात. यानंतर रवी राणा माफी मागत असतील. तर रवी राणा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे पाठवायला पाहीजे. हे ते करत नाहीत. याचा अर्थ टीम देवेंद्रंना ठरवून एकनाथ शिंदे आणि बाकी आमदारांची राजकीय कारकिर्द संपवायची आहे.”

यापूर्वी देखील कोल्हापूर येथील सभेत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. भाजपने आश्वासनांची खैरात केली होती. ही आश्वासनांती खैरात आता हवेत विरून गेली आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक प्रोजेक्ट हा गुजरातमध्ये जात आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र मागील काळात झालं, असे म्हणून त्याची सारवासारव करत आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे की गुजरातचे. गुजरात आमचाच भाऊ आहे. आमच्याच देशाचा भाग आहे. पण गुजरातला मुख्यमंत्री आहेत की तुम्ही कशासाठी जास्तीचा भार उचलत आहात, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला होता.

“जाणीवपूर्वक महाराष्ट्राला कंगाल करण्याचा, महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. राजकीय अस्थिरता निर्माण झाली की सहाजिकचं उद्योगपतींना इथं गुंतवणूक करावी वाटणार नाही. देशाची राजधानी मुंबईचा मान कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे बेरोजगारांची संख्या वाढेल. हे भाजपचं अत्यंत घाणेरडे, कुटील महाराष्ट्रद्रोही धोरण सुरु आहे. हे धोरण लोकांसमोर उघडे पाडणे, आमचा हेतू आहे”, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.