Sushma Andhare | “त्यांच्यावर झालेला हल्ला निंदणीय…”; संदीप देशपांडेंच्या हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | मुंबई : राजकारणात काय घडेल. काय बिघडेल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना उपविभागप्रमुख नेत्याची ठाण्यात हत्या झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. आज (ता.3 मार्च) दिवशी मनसे नेते संदीप देशपांडेंना शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करताना मारहाण झाली. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलंय.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“संदीप देशपांडेंवरील झालेला हल्ला निंदणीय आहे. या हल्ल्याचा लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या लोकांनी निषेध करावा. काही दिवसांपूर्वी प्रज्ञा सातव आणि आज संदीप देशपांडेंवर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय?” असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय. “अकोल्यात देखील असाच प्रकार घडला आहे. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी झाली. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची पकड ढीली झाली आहे. यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे” असं शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारेंनी फडणवीसांना टार्गेट केलंय.
ठाण्यात देखील शिवसेना उपविभागप्रमुखाची हत्या
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेना उपविभागप्रमुखाची हत्या झाली. हि हत्या जांभळीनाका येथे झाली असून रवींद्र परदेशी अस हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं. या ठिकाणीच बाजारपेठेत त्यांची देखील जागा होती. यातूनच त्यांची हत्या झाली. ही हत्या रात्री १० च्या सुमारास झाली असल्याचं समजतंय. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. धृव आणि अशरफ हे मारेकऱ्यांचे नावे असल्याची माहिती समजतेय.
महत्त्वाच्या बातम्या-
- Eknath Shinde | “त्या कंपाऊंडरच्या नादाला लागू नका”; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना खोचक टोला
- Chinchawad | 44 हजार मतं मिळवली, आघाडीचा उमेदवार पाडला, तरीही राहुल कलाटेंचं डिपॉझिट जप्त
- Devendra Fadnavis | “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन” नंतर “आम्ही पुन्हा येऊ” भाग – २
- Sanjay Raut | “शरद पवारांचा माझ्या वक्तव्याला विरोध नाही, आता लटकवा…”- संजय राऊत
- Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेनी फडणवीसांवर उधळली स्तुती सुमने; विधानपरिषदेत पहिल्यांदाच भाषण
Comments are closed.