Sushma Andhare | “त्यांच्या पत्रकार परिषद म्हणजे नाक्यावरच्या बंबाट्या”; सुषमा अंधारेंची सोमय्यांवर जहरी टीका

Sushma Andhare | पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. किरीट सोमय्या हे विरोधी पक्षातील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. सोमय्यांच्या आरोपांनंतर संबंधित नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयटीच्या धाडी पडतात. या पार्श्वभूमीवरच सुषमा अंधारे यांनी सोमय्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

Sushma Andhare’s Press Conference in Pune

“सोमय्या यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप केले. त्यांच्या विरोधात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. अनेक ट्विट केले. पण ते सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला आल्यावर त्यांच्याविरोधात सोमय्या बोलत नाही. याचा अर्थ काय होतो? ईडी आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षेत्रात वारंवार हस्तक्षेप करणारे सोमय्या कोण आहेत? सोमय्या ईडीचे अधिकारी आहेत की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Sushma Andhare Criticize On BJP And Kirit Somaiyya 

“सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 22 पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळी यांच्याविरोधात 8, यशवंत जाधव यांच्याविरोधात 16, अर्जुन खोतकर यांच्या विरोधात 9 आणि आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात 6 पत्रकार परिषदा घेतल्या. तसेच भावना गवळी यांच्या विरोधात 124 ट्विट केले. अडसूळ यांच्याविरोधात 20, सरनाईक यांच्याविरोधात 55, खोतकर यांच्या विरोधात 15 आणि यशवंत जाधव यांच्या विरोधात 21 ट्विट केले. सोमय्यांना बाकी काही काम नाहीये का? की भाजपने आरटीआय टाकण्यासाठी माणूस ठेवला आहे काय? असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

“त्यांच्या पत्रकार परिषद म्हणजे नाक्यावरच्या बंबाट्या”

“किरीट सोमय्या अनेक पत्रकार परिषद घेत असतात पण ती पत्रकार परिषद असण्यापेक्षा नाकावरच्या टपोरी पोरांनी थांबून केलेल्या बंबाट्या आहेत. त्यांची पत्रकार परिषद पाहता प्रत्येकाला वाटेल की, ईडीच्या प्रमुख पदावर सोमय्यांची वर्णी लागली की काय? इतक्या आत्मविश्वासाने ते बोलत होते”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

“किरीट सोमय्या ईडीचे कर्मचारी की अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी?”

“खेड प्रकरणात सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाली. या प्रकरणात सोमय्या दापोलीत कितीवेळा गेले. खेड दापोलीत सोमय्या 11 वेळा गेले. ईडीने दापोलीला भेटी दिल्या असत्या तर समजू शकते. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असत्या तरीही समजू शकले असते. पण किरीट सोमय्या कोण आहेत? ते ईडीचे कर्मचारी की अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी आहेत का? सोमय्या ईडी आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षेत्रात ते ढवळाढवळ करतातच कसे?”, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-