Sushma Andhare | “प्रिय निलू बाळा…”; निलेश राणेंनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचा खोचक टोला

Sushma Andhare | मुंबई : भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका करताना ‘बारामतीचा खासदार बदलावा लागेल’, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) ट्वीट करत राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.

Nilesh Rane Criticize on Supriya Sule

“या ठिकाणी ६ पैकी २ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अजित पवार अनेक वेळा पालकमंत्री राहिले आहेत. शरद पवार स्वतः बारामतीचे किंम जॉन्ग आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. एवढं असून जर आंदोलन करावं लागतं, तर बारामतीचे खासदारच बदलावे लागतील”, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

सुषमा अंधारेंचा निलेश राणेंना खोचक टोला

“प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने लिहिलेस म्हणून, हिंदुत्ववादी आहोत म्हणत केंद्रात भाजप अन् राज्यात ईडी सरकार आले. तरीही शिवसेनाभवनच्या समोर हिंदुत्वासाठी आक्रोशमोर्चा काढावा लागत असेल, तर याचा अर्थ विद्यमान सरकार हे हिंदुत्वविरोधी आहे. त्यामुळे ते बदलावेच लागेल नाही का?”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी निलेश राणेंच्या ट्विटला रिट्वीट करत निलेश राणेंना खोचक टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.