Sushma Andhare | बच्चू कडू-राणा वादावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “बच्चू कडूंची कारकीर्द…”

Sushma Andhare | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद मिटला असल्याचे बोलले जात असतानाच बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रवी राणा यांना टोला लगावला. पहिली वेळ आहे म्हणून माफ आहे. यापुढे काही कराल तर प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना नाव न घेता दिला.

यावर रवी राणांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर रवी राणाने उद्धव ठाकरें दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय असल्याची टीका रवी राणा (Ravi Rana) यांनी केली. त्यावर बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, या वादावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रवी राणा आणि भाजपावर टीकास्र सोडले आहे. राणांच्या माध्यमातून बच्चू कडूंची राजकीय कारकीर्द संपवण्याचा हा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, बच्चू कडू यांचे व्यक्तिमत्त्व फार चांगलं आहे. ते लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत, अशा व्यक्तीवर आरोप करणं ही क्लेषकारक आहे. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली होती, ती एका अर्थाने योग्य होती. कारण प्रश्न त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा होता.

यावेळी त्यांनी रवी राणा यांच्यावर मात्र खोचक टीका केली आहे. रवी राणांसारखी माणसं जी उथळ व्यक्तव्य करत, ती कायम लोकांमध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण करतात. अमरावतीत कुपोषणासारखे अनेक प्रश्न आहेत, त्यावर ते बोलत नाहीत. मात्र, अशी वक्तव्य करून वाद पेटण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या, संविधानानुसार राज्यापालांकडे विशेषाधिकार आहेत. त्यांचा त्यांनी वापर करायला हवा. एकाद्या लोकप्रतिनिधीचे चरित्रहनन करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असेल आणि असा प्रयत्न करणारी व्यक्ती सभागृहाची सदस्य असेल, तरी त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस राज्यापालांनी करायला हवी, अशी कायद्यातली तरतूद आहे. त्यामुळे राज्यपाल महोदय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवी राणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवणार का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.