Sushma Andhare | “बाप समजदार असेल तर पोरं…”; राणेंच्या होमपीचवर सुषमा अंधारेंची फटकेबाजी

Sushma Andhare | सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गात आहेत. यावेळी बोलताना त्यांनी कणकवलीत राणेंच्या होमपीचवर नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांवर टीका केली. अंधारे यांनी माझे दोन बारके बारके भाचे म्हणत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांचाही आपल्या शैलीत समाचार घेतला.

“जी जी जागा चांगली दिसली त्या ठिकाणी सातबारा माझा झाला पाहिजे. नाही झाला तर खोट्या केसेस टाकायला आम्ही तयार आहोत”, असं म्हणत त्यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. त्यांच्या लेकरांना काय समजावून सांगावं. कारण बाप समजदार असेल तर पोरं समजदार होतील, असा टोला त्यांनी निलेश राणे आणि नितेश राणे यांना लगावला.

भाजपने किरीट सोमय्यांना समजून घ्यावं, भाजपन मंत्री पद देऊन त्यांचे पुनर्वसन केलं पाहिजे, असे सांगतानाच अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही हे चुकलेलं आहे, असं म्हणत सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली.

सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर देखील घणाघात केला याहे. किरीट सोमय्या हे कंत्राटी कामगार आहेत का, ईडीने त्यांना ईडीने कंत्राटी कामगार म्हणून नेमले आहे का, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना डिवचलं. तसेच नारायण राणे खतम, असे म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांना राणेंना मंत्री पद मिळाल्यानंतर मुंबईत राणेंना पायघड्या टाकणारे तेच किरीट सोमय्या आहेत, असं अंधारे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.