Sushma Andhare | “मला मारहाण…”; मारहाणीच्या प्रकरणावर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण

Sushma Andhare | बीड: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला. मात्र, सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक लाईव्ह घेत घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. त्याचबरोबर आप्पासाहेब जाधव यांनी केलेला दावा खोटं असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट (Facebook post by Sushma Andhare)

आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव याने काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडिओ जाहीर केला आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची दिनांक वीस तारखेला ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभा गालबोट लावण्यासाठी हा सगळा बनाव केला.

यात किती तथ्य आहे किँवा नाही हे सांगण्यासाठी आपल्यासमोर जिल्हाप्रमुख अनिल जगताप, लोकसभा संपर्कप्रमुख धांडे सर , तद्वतच उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर , उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव कुलकर्णी , तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे तालुकाप्रमुख व्यंकट शिंदे सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंभोरे शहर प्रमुख राजेश विभुते नितीन धांडे जिल्हा संघटक नितीन धांडे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जगताप असे अनेक मंडळी आप्पासाहेब जाधव हा काय प्रकार आहे यावर बोलत आहेत कृपया माध्यमांनी नोंद घ्यावी.

https://www.facebook.com/andhare.sushama/videos/255457966968944/?t=0

दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. सध्या सुषमा अंधारे बीड दौऱ्यावर आहेत. जाधव यांनी अंधारेंवर मारहाण झाल्याचा आरोप केला. मात्र, मला मारहाण झालेली नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OwNVSG

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.