Sushma Andhare | “मी एका मिनिटात शिवबंधन तोडणार, पण…”, सुषमा अंधारेंचं आव्हान

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या म्हणुन कमी कालावधीत अधिक प्रसिद्ध झालेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) पक्षासह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवबंधन सोडायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, असं करण्याआधी त्यांनी एक अट घातली आहे.

सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी लावणार? असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे.

माझ्या सभांना इतकी गर्दी कशी जमते ? हे लोक येतात कुठून? मी संताचा विचार सांगतेय. मी भाजपचा द्वेषपूर्ण राजकारण संपवण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढत आहे. या देशाची नागरिक म्हणून काही प्रश्न पडले आहेत, त्याची उत्तरे शोधत आहे, असं देखील त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.