Sushma Andhare | “मी काय दहशतवादी किंवा गुंड आहे का?”, सवाल करत सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संताप

Sushma Andhare | जळगाव : निवडणूकांचं वारं सध्या सगळीकडे वाहू लागलं आहे. त्यामुळे सगळे पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी आपले दौरे, सभा देखील सुरू केले आहेत. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची जळगावातील मुक्ताईनगर याठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र अंधारे यांना सभास्थळी जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या सगळ्यावरून आपला संताप व्यक्त केला.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)

सुषमा अंधारे यांनी याबाबत प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सभास्थळी जाण्यासाठी त्या गाडीत बसल्या असता, जवळपास 500 पोलिसांनी त्यांना अडवलं आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, सभास्थळी जाण्यासाठी मी गाडीत बसले आहे. मात्र, पोलिसांनी मला परवानगी नाकारली आहे. जवळपास पाचशे पोलिसांनी मला गराडा घातला आहे. माझ्याविरोधात दबावतंत्रांचा वापर वापर केला जात आहे. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) माझ्यासोबत एवढं सूडाचं राजकारण का करत आहेत?.

पुढे बोलताना अंधारे असंही म्हणाल्या की, मला ताब्यात घेतलंय की नाही, हेही मला अजून माहीत नाही. नेमकी परिस्थिती काय आहे? हेही मला सांगितलं नाही. पोलिसांनी मला सभास्थळी जाण्यास मज्जाव केलाय, हे खरं आहे. पण मज्जाव का केलाय? याचं नेमकं कारण काय आहे, हेही मला कळालं नाही.

आपल्या अटकेचं कारण विचारणं, हा आपला अधिकार आहे. पण मला ते कारण कळालं नाही. माझा दोष काय आहे? हेही मला सांगण्यात आलं नाही. महिला पोलीसही तैनात करण्यात आल्या आहेत. सर्व बाजुने मी नजरकैदेत आहे. मी काय दहशतवादी आहे का? किंवा मी गुंड आहे का?, असे सवाल सुषमा अंधारे यांनी याठिकाणी केले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.