Sushma Andhare | “मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण त्याआधी…”; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

Sushma Andhare | पुणे : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“पक्षाने आदेश दिले तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र माझा राजीनामा घेण्याआधी तुम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, स्वयंघोषित कीर्तनकार, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेणार का?”, असा सवाल त्यांनी विरोधकांना केलाय.

राजकीय सुडापोटी माझ्यावर आरोप केला जातोय. माझ्यामागे ईडी लावता येत नाही, म्हणून धार्मिक वाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय. पुढे त्या म्हणतात, शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मी अशी वक्तव्ये करत नाही. आधी मी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही.”

माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जातात, मग हे लोक मधले 10 ते 15 वर्ष हे कुठे गेले होते?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. माझ्यासाठी माझा पक्ष महत्त्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचं असेल तर मी कुठूनही करू शकते. मी जर पक्षाबाहेरून काम केलं तर भाजपसाठी पळता भुई थोडी करेन, असा इशारा सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.