Sushma Andhare | ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’, असं काही नसतं; सुषमा अंधारे यांचा खोचक टोला

Sushma Andhare | मुंबई: कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. यामध्ये काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. अशात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटक निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “मोदी हैं तो मुनकीन हैं, असं काही नसतं. मोदींना देखील हरवता येतं. कर्नाटकचा विजय ऊर्जादायी असणार.”

पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. अंधारे म्हणाल्या, फडणवीसांनी कर्नाटकामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काहीच गरज नसताना फडणवीस यांनी बजरंगबलीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, या सगळ्यांचा अजिबात फायदा झाला नाही. असे तेढ महाराष्ट्रात वापरताना फडणवीस आता दहा वेळा विचार करतील.”

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित झाला आहे. तर काँग्रेसचे टी रघुमूर्त हे चालगिरामधून १६ हजार मतांनी विजय झाले आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.