Sushma Andhare | राज ठाकरेंवर तुम्ही गुन्हे दाखल केले का? ; सुषमा अंधारेंचा सवाल

Sushma Andhare | मुंबई : तीन महिन्यांच्या बाळासाठी पाचशे पोलीस का लागले. मुक्ताईनगरमध्ये अडवल्यावरुन सुषमा अंधारे यांनी हा सवाल केला आहे. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे वाद चांगलाच पेटला आहे. महाप्रबोधन यात्रेला परवानगी नाकारल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना चांगली आक्रमक झाली आहे.

मुक्ताईनगरमध्ये मला थांबवण हा गुलाबराव पाटील यांचा ट्रॅक होता, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी अनेक लोकांच्या मिमिक्रि केल्या त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत, असे देखील सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

धरणगाव मतदार संघातले पाणीवाले बाबा-

सुषमा अंधारे म्हणाल्या, “तीन महिन्याच्या बाळासाठी तुम्हाला ५०० पोलिसांच्या गराडा घालण्याची गरज का पडते. तीन महिन्याच्या बाळासाठी अख्खी यंत्रणा, सगळे ४० पैशांच्या हिशोबाने मेसेज करणारे पेड ट्रोलर्स आणि सगळे गृहमंत्रालय तुम्ही का कामाला लावता. धरणगाव मतदार संघातले पाणीवाले बाबा उर्फ छंदीफंदी शायर उर्फ आमचे लाडके बंधू उर्फ मिंधे गटातले बंडखोर आमदार उर्फ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे.”

राज साहेबांवर तुम्ही गुन्हे दाखल केले का?-

“ठाण्यातील सभेमध्ये आक्षेप होता. की मी मिमिक्रि केली. तुम्ही मोदीजींची मिमिक्रि केली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करतोय. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सारखी मी चांगली मिमिक्रि आर्टीस्ट नाही. मग राज साहेबांवर तुम्ही गुन्हे दाखल केले का?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.