Sushma Andhare | “रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ, तर भुमरे…”, सुषमा अंधारे बरसल्या
Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या चांगल्याच आक्रमक असून त्या शिंदे गटावर तसेच भाजप (BJP) पक्षावर जोरदार हल्लाबोल करत असतात. औरंगाबाद येथील सभेला संबोधित करताना त्यांनी सुषमा अंधारे यांनी रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना डिवचण्याचं काम केलं आहे.
यावेळी, रावसाहेब दानवे यांननी अनेक विकास कामे दुसरीकडे वळवली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निधीन मिळाला नाही. त्यातच दानवे यांननी आपल्या जवळच्या लोकांना कामे दिली, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
यावेळी संदीपान भुमरे यांच्यावर घणाघात करत असताना, मी आता एका एका भावाची काळजी घेत बोलत बोलत पैठणमध्ये आले आहे, मी बहीण आहे आणि मी माझ्या भावाला ओवाळायला आले आहे, माझ्या या भावाने लोकांसाठी काम केलं, आमच्या भावाने लोकांची गरज ओळखली असून पैठणमध्ये भुमरे यांनी काय दिवे लावले? राज्यातील देवस्थाने सुंदर आहेत. परंतु पैठण आणि नाथ मंदिराची दुरावस्था झाली आहे. पैठणकडे रावसाहेब दानवे यांनीही लक्ष दिले नाही, असं अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, इथे औषध गोळ्या नाही मिळाल्या, प्यायला नाही मिळालं तरी चालतं. पण इथे 30, 60, 90 ची व्यवस्था केली. आता भाऊ आहे माझा म्हणून माहिती आहे मला. माझी वहिनी म्हणजे भुमरे यांच्या पत्नी भाषण ऐकत असतील, असं देखील अंधारे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Congress | रणजीत सावरकर यांनी पंडित नेहरुंवर केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेत्याचा पलटवार, म्हणाले…
- Ranjeet Savarkar | “एका बाईसाठी पंडित नेहरुंनी देशाची फाळणी केली”, रणजीत सावकरांचा धक्कादायक आरोप
- Narayan Rane | “आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांना…”, नारायण राणेंचा खोचक टोला
- Uddhav Thackeray | “स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार…”, ठाकरे गटाने घेतला समाचार
- Sushma Andhare | “मी एका मिनिटात शिवबंधन तोडणार, पण…”, सुषमा अंधारेंचं आव्हान
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.