Sushma Andhare | राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘पार्सल’ म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना सुषमा अंधारेंचा पलटवार, म्हणाल्या…

Sushma Andhare | मुंबई :  राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापत चाललं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना जळगावमध्ये सभा घेण्यास नकार दिल्यामुळे गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये चांगलंच युद्ध युरू असल्याचं दिसून येतं आहे. तर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अंधारे यांच्यावर टीका करताना, सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘पार्सल’ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावरून अंधारेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)

गुलाबराव पाटलांची सध्या प्रचंड धांदल उडालेली आहे. ते गोंधळून गेले आहेत. त्यांना काय बोलावं हे सूचत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. सुषमा अंधारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

अगोदर ते मला तीन महिन्यांचं बाळ म्हणाले होते. जर तीन महिन्याचं बाळ म्हणत असाल तर मग या तीन महिन्याच्या बाळाला मारून, कुटून गप्प बसवा ना. त्याच्यासाठी 500 पोलीस कशासाठी वापरताय? आता ते म्हणत आहेत की हे राष्ट्रवादीचं पार्सल आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसची साधी प्राथमिक सदस्यही नव्हते. माझं खुलं आव्हान आहे कोणीही माहिती अधिकाराखाली ही माहिती काढावी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून माहिती घ्यावी किंवा अन्य कुठूनही माहिती घ्यावी माझा कधीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला नाही

तसेच, एकमेव हल्लाबोल यात्रा जी परळीत झाली होती, त्या यात्रेत सुद्धा माझं वाक्य आहे की मी राजकारणातील मुलगी नाही. गणराज्य संघ ही एक महाविकास आघाडीशी जुडलेली संघटना होती, आमचा छोटा जीव आहे. आमचा एकही उमेदवार निवडणुकीत नव्हता, त्यामुळे स्वाभाविक आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसभा केल्या असल्याचंही अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.