Sushma Andhare | वर्षा बंगल्यावर असणार अजित पवारांचं वर्चस्व? सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Sushma Andhare | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार यांना भाजपनं मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला असल्यानं ते सरकारमध्ये सामील झाले असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar will be the Chief Minister – Sushma Andhare

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी खूप वेळ लागत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होणार आहे. ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे.”

या प्रकरणावर (Sushma Andhare) भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय काकडे म्हणाले, “अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांची ही महत्वकांक्षा कुणापासूनही लपलेली नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं, हे जग जाहीर आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि अजित पवारांमध्ये काही चर्चा झाली असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील.”

दरम्यान, सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि संजय काकडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांना लवकरच वर्षा बंगला सोडावा लागणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. कारण अजित पवार मुख्यमंत्री होऊन वर्षा बंगल्यात राहायला जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46MOlLo

You might also like

Comments are closed.