Sushma Andhare | ” शरद पवार शरद पवार मेथीच्या लाडूसारखे तर राज ठाकरे…”, सुषमा अंधारेंनी नेत्यांना दिल्या फराळांच्या उपमा
Sushma Andhare | मुंबई : देशभरात दिवाळी जोरात सुरु आहे. तब्बल दोन वर्षांनी फटाक्यांचा जोरदार आवाज ऐकायला मिळत असून अनेक ठिकाणी दिवाळी पाहाट सारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील नेते देखील काहीसे शांत दिसत आहे. सर्वांच्या घरात फराळाची तयारी सुरु असून फराळ देखील बनले आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नेत्यांना फराळांची उपमा देत टीका केली आहे.
सुषमा अंधारे सध्या बीडच्या परळीमध्ये आपल्या माहेरी आल्या असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ तयार केला. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत, असं म्हणत शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात, असं अंधारे म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली. यावेळी अंधारे यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दलही सांगितले, राजकारणात नारायण राणे हे फटाक्यातल्या दिशाहीन रॉकेट सारखे असून उद्धव ठाकरे हे बॉम्ब असल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
दरम्यान, फटाक्याची लड म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणाऱ्या छोटे फटाके म्हणजे नारायण राणेंची दोन मुलं असल्याचं म्हणत त्यांनी राणे कुटंबाला डिवचलं आहे, नवनीत राणा यांचा सुषमा यांनी उल्लेख गोल गोल आणि काटेरी दिसणाऱ्या चकली, असा केला.
महत्वाच्या बातम्या :
- Solar Eclipse | मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दिसणार आज खंडग्रास सूर्यग्रहण
- Deepak Kesarkar | “फक्त लोकांना भडकवून सरकार चालवता येत नाही, त्यासाठी…”; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Supriya Sule | अखेर सुप्रिया सुळेंनी ‘तो’ शब्द पाळला, गावकऱ्यांचा पेढे वाटून जल्लोष
- NCP | राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का! दिवाळीनंतर ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- NCP | “हे सरकार स्वतःच्या आनंदाची दिवाळी साजरी करतंय”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.