Sushma Andhare | “शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक”; सुषमा अंधारेंची कदमांवर जहरी टीका

Sushma Andhare | अहमदनगर : राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर आगपाखड केली. ठाकरे गटाने शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यानंतर आता अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह भाजपवर आगपाखड केली. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावरही निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर रामदास कदम यांनी जोरदार टीका केली. 19 तारखेच्या सभेतून आपण सगळी उत्तरं देणार असल्याचं रामदास कदम म्हणाले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टोला लगावला आहे.

“शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक”

“खेडच्या सभेत संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, सभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिमगा आहे. त्यामुळे शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक आहे. काल शिमगा होता, त्यामुळे रामदास कदम किंवा गुलाबराव पाटील यांनी शिमग्याला बोंब मारली असेल तर ती आपण समजून घेऊ. याच्या पलीकडे त्यांना अधिक महत्त्व द्यावं, असं आम्हाला वाटत नाही”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

Sushma Andhare Criticize Yogesh Kadam 

“योगेश कदमांनी अत्यंत दर्पयुक्त आणि अहंकाराने भरलेली वाक्य वापरली. पण आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने बडबड करत आहेत. त्याही पेक्षा लोकांच्या दरबारात जाऊन लोकांचं म्हणणं काय आहे, हे ऐकून घेणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते काय बोंब मारतात. त्यावर उत्तरं देण्यापेक्षा आम्हाला शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी बोलणं जास्त गरजेचं वाटतं”, असं सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.