Sushma andhare| सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर ; म्हणाल्या…

Sushma andhare| नागपूर : सध्या राजकीय वर्तुळात 2019 मध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar) यांनी पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी घेतला होता असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जातं असून आताच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार शब्दात निशाणा साधत प्रतिक्रिया दिली आहे.

‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती’ : सुषमा अंधारे

माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सुधीर भाऊ जे बोलतात ते त्यांचं त्यांना माहीत परंतु मुनगंटीवार यांनी उद्धवसाहेबांना धडा शिकवण्याची भाषा केली याबाबत मला असं वाटते की, शिंदे साहेबांसोबत जाऊन त्यांनी आता मोठा धडा शिकलेला आहे. त्यामुळे तो धडा घेतल्यानंतर त्यांना वाटत असेल की आपण आगीतून उठून फुफाट्यात पडलो आहे. यामुळे ते आता अशी भाषा करत आहेत. याचप्रमाणे कर्नाटकच्या निवडणुकनंतर त्यांनी काहीतरी धास्ती घेतलेली आहे. त्यात शिंदे साहेबांसोबत गेल्यानंतर जी त्याच्या आजूबाजूला नकारात्मकता वाढली आहे. असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती’ हे सुधीर भाऊंच्या लक्षात येत नसावं त्यामुळे ते अशा प्रकारची वाक्य वापरत आहेत.असा टोला अंधारे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार (What did Sudhir Mungantiwar say)

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होतं की, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली. परंतु त्यानंतर विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेसचा हात धरला. यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता,असं सुधीर मुनगंटीवार आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर अंधारे यांनी सडकून टीका करत पलटवार केला.

महत्त्वाच्या बातम्या-