Sushma Andhare | सुषमा अंधारेंनी शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या…

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या प्रबोधन यात्रेनिमित्ताने आज नाशिकमध्ये आल्या आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, शिंदे गटात कोणते नाराज आहेत हे नाव घेत त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी, नाशिकमधील सुहास कांदे नाराज आहेत. औरंगाबादेतील संजय शिरसाट हे नाराज आहेत. शिंदे गटातील नाराजांची संख्या फार मोठी आहे. ज्या-ज्या लोकांना घेऊन गेले होते, त्या सर्वांनाच मंत्रीपदाची गाजरं दाखवण्यात आली होती. मात्र या सर्वच लोकांना संतुष्ट करणे एकनाथ शिंदे तसेच भाजपाला अशक्य आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

तसेच, भाजपाची स्थिती घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं, अशी झाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार बडबड करत मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर आले होते. त्यांचा हा व्हिडीओ सर्वांनीच पाहिला असेल. प्रताप सरनाईक हेदेखील मुख्यमंत्र्यांवर चिडले होते, असं देखील त्या म्हणाल्या.

याबाबत बोलताना, प्रताप सरकारनाईक, गीता जैन आणि नरेंद्र मेहता या तीन नेत्यांनी मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या एका बैठकीत एकमेकांना बसायला खुर्च्या दिल्या नाही. त्यामुळे २०२३ साली मध्यावधी निवडणुका लागतील हे नक्की, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.