Sushma Andhare | सुषमा अंधारे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा

Sushma Andhare | सिंधुदुर्ग : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) भाजप आणि शिंदे गटावर महाप्रबोधन यात्रेतून हल्लाबोल करत आहेत. काल सुषमा अंधारे यांची औरंगाबाद येथे सभा झाली. त्यांनी नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, अंधारे यांची सिंधुदुर्गमध्ये कणकवली येथे सभा होणार आहे. ह्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा दिल्या आहेत.

आमदार वैभव नाईकांसह अन्य स्थानिक नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन ह्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज कणकवली येथे पोहचेल.

गेल्या तीन दिवसांपासून महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून औरंगाबादेत सभा घेत असलेल्या सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषदेत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. अंधारे म्हणाले की, महागाईच्या मुद्द्यावर भाजपने २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता, आज त्याच मुख्य प्रश्नापासून मोदी सरकार दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज महागाई गगनाला भीडली आहे. सरकारला त्यावर तोडगा काढता येत नाही. याचे उत्तर द्यायला भाजपकडे वेळ नाही.

किरीट सोमय्या आणि भाजपचे तथाकथित नेते भ्रष्टाचारावर भरभरून बोलतात. यांनी काही महिन्यांपूर्वी ईडीच्या नोटिसांमुळे प्रताप सर नाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांच्यावर टीका केली होती. या नेत्यांवर आरोपपत्र कधी दाखल होणार, असा माझा प्रश्न आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर संताप व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.