Sushma Andhare । अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर सुषमा अंधारेंची भाजपवर टीका; म्हणाल्या…
Sushma Andhare । मुंबई : ज्या निवडणुकीमुळे राज्याचं संपूर्ण राजकारणच ढवळून निघालेलं पाहायला मिळालं होतं. त्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. लटकेंच्या या विजयानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा (Sushma Andhare) अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, मी यापूर्वीही सांगितलं आहे, की अंधेरी पूर्वची जागी शिवसेनेची आहे. दिवंगत रमेश लटके यांनी आपल्या कार्यकतृत्वातून सिद्ध केलेली ही जागा आहे. त्यामुळे ती जागा आम्ही जिंकणं फार स्वाभाविक होतं. मात्र, भाजपाने अत्यंत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय.
सुरुवातीला त्यांनी अर्ज दाखल केला आणि जेव्हा लक्षात आलं आपण निवडणूक जिंकू शकत नाही, तेव्हा सुसंस्कृतपणा वगैरे कारणं देऊन माघार घेतली असल्याचं त्या म्हणाल्या. “परंतु आता नोटाला मिळालेली मतं बघितली, तर भाजपा किती कपटनितीचे राजकारण करू शकते, याचा अंदाजा येईल”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
दरम्यान, नोटाला मिळालेली मतं ही भाजपची खेळी असल्याचा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनीही केला आहे. माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, शिवसेनेचं यश कलंकित करण्यासाठी नोटाचा वापर केला गेला आहे, बाकी काही नाही. यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rutuja Latke | “मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार, हा माझ्या पतीचा…”, ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया
- T20 World Cup | बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तान संघ पोहोचला उपांत्य फेरीत
- Yashomati Thakur । “कोणाकडे किती नट्या आहेत, हे सर्वांना माहितीय”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर यशोमती ठाकूर भडकल्या
- Eknath Shinde | काय ती झाडी, काय ते डोंगार! एकनाथ शिंदे पुन्हा ५० आमदारांसोबत गुवाहाटीला, यंदा डाव काय?
- T20 World Cup | 15 वर्षानंतर फायनलमध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार?
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.