Sushma Andhare । उद्धव ठाकरेंसोबत शिंदे गटातील अनेक आमदार परत येणार? सुषमा अंधारेंचा दावा

Sushma Andhare । मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या आपल्या विधानांमुळे सदैव चर्चेत असतात. अंधारे या सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना दिसत आहेत. मात्र आता सुषमा अंधारे यांनी मोठा दावा करत शिंदेंची चिंता वाढवली आहे. सुषमा अंधारे यांनी शिंदें सोबत गेलेल्या आमदारांबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. तसेच त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर ही टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया –

हा दावा करताना सुषमा अंधारे म्हणाल्या कि, शिंदे गट आणि भाजप या दोघांत खूप असंतोष आहे. येणाऱ्या काळात या असंतोषाचा भडका उडेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सतत खटके उडत आहेत. मात्र, भाजप सोबत गेलेले एकनाथ शिंदे स्वाभिमान गहान ठेवतात. एकनाथ शिंदे यांचा उपमर्द करण्याचं काम सध्या भाजप मध्ये सुरू आहे. त्यांचा माईक काढला जातो. त्यांना कागद पुरवली जातात. तोंडावर कागद ठेऊन त्यांना सूचना करतात. मुख्यमंत्री सक्षम नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

आगामी काळात या असंतोषाचा भडका उडेल आणि शिंदे गटातील आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) येतील असा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. शिंदे सोबत गेलेले अनेक आमदार चिंतातुर आहेत. ते उद्धव ठाकरेंसोबत परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परत येतील की नाही माहीत नाही. पण, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. चाळीस पैकी एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.