Sushma Andhare । “भाजप तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्रं लिहाच”, सुषमा अंधारेंची राज ठाकरे यांना विनंती

(Sushma Andhare) मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली होती. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली होती. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं.

यानंतर भाजप नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या. यामध्ये भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील आणि अपक्ष म्हणूनही लढणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला. राज ठाकरे यांच्या पत्रामुळे भाजपने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

खरंच जर भाजप तुमचं एवढं ऐकत असेल तर राज ठाकरे साहेब तुम्ही हि दोन पत्र त्यांना लिहा. अशी विनंती करत सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. “भाजपाने राज ठाकरेंच्या पत्राचं कारण पुढे केलं. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे की खरंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राचा परिणाम भाजपावर होत असेल किंवा भाजपा त्यांचं ऐकत असल्यास माझी विनंती आहे राज ठाकरेंना. राज भाऊ तुम्ही एक पत्र भाजपाला लिहा”, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटल आहे.

ते पत्र असं लिहा की महामहीम राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसणारे कोश्यारीजी जर वारंवार महाराष्ट्राचा अवमान करत असतील तर असे राज्यपाल कथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत,” असं अंधारे यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच अन्य एका पत्राचा सल्ला देताना सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना, “महाराष्ट्रातील फॉक्सकॉन वेदान्ता हा महत्त्वकांशी प्रकल्प जो गुजरातला गेलाय तो परत येण्यासंदर्भातील पत्र लिहा,” अशी विनंती केली आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्याला राज ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.