Sushma Andhare | “2012 ला बाळासाहेबांचं निधन, केसरकर 2014 ला शिवसेनेत आले, मग बाळासाहेबांचं हिंदुत्व कधी शिकले?”

Sushma Andhare | कोल्हापूर :  शिंदे गटाच्या बंडांनंतर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून गद्दार म्हणत आरोप केले जात आहेत. यावर आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत आलो असल्याचं स्पष्टीकरण शिंदे गटाकडून देण्यात येतंय. या मुद्द्यावरून शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणुन कमी कालावधीत अधिक प्रसिद्ध झालेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर टीका केली आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 साली निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी दीपक केसरकर 2014 ला शिवसेनेत आले. केसरकर सातत्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर भाष्य करतात. पण मग ते हे हिंदुत्व शिकले कधी?”,असा सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विचारला आहे.

गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे या राष्ट्रवादीतून आल्या आहेत, असं विधान केलं होतं. यावर त्या म्हणाल्या, मी कधीही राष्ट्रवादीची सदस्य नव्हते. तरीही गुलाबराव पाटील म्हणतात की, मी राष्ट्रवादीतून आले. पुढे त्या म्हणाल्या, “गुलाबराव पाटील यांना आवरा. महिलांवर कमरेखालचे वार केले जात आहेत. शिंदेगटाचे नेते कौटुंबिक पातळीवर जा टीका करत आहेत.”

दरम्यान, भाजपा कपटी कारस्थानी करणारी आहे. भाजपने द्वेषमूलक राजकारण सुरू केलं आहे. हे राजकारण संपून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. त्याबरोबरच येत्या 20 तारखेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांची भेट होणार होती. पण वंचित कडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.