सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून निषेध

परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, रबीचा हंगाम वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारा भाजीपाला पिकविला़ मात्र भाजीपाल्यालाही भाव मिळत नाही़ टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ या शिवाय जिल्ह्यात दुष्काळी योजनांना सुरुवात झाली नाही़ या कारणांवरून कृषी राज्यमंत्री आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलालगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनासमोर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त  केला़.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारी साधारणत ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी पोलीस बंदोबस्तही होता़ परंतु, अचानक झालेल्या या प्रकारामुळे काहीसा गोंधळ उडाला आणि त्याच परिस्थिती खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला़

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी खोत परभणीला आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, केशव आरमळ आदींसह इतर कार्यकर्ते उड्डाणपुलाजवळ सुरुवातीपासूनच थांबले होते. यावेळी पोलीस बंदोबस्तही होता. याच परिस्थितीत खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.