Swine Flu| ठाणे मध्ये स्वाईन फ्लू आजाराचं थैमान, मृत्यू संख्येतही वाढ

मुंबई :  कोरोनाची भीती कमी झाली असता आता ठाणे जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लू ने थैमान घातलं आहे. या आजाराचं संकट अधिकच वाढत होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये 52 नव्या स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद करण्यात आली असून मृत्यू होणाऱ्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या 402 तर बळींची संख्या 14 वर पोहोचली आहे.

स्वाइन फ्लू रुग्णांमध्ये वाढः

स्वाइन फ्लू या आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे. अशातच गणेशोत्सव तोंडावर आला असून सण उत्सवाच्या काळात वाढत्या रुग्णसंख्येमुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यातील संख्या 350 झाली तर नव्याने एकही रुग्ण दगावला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे पालिका हद्दीत स्वाईन फ्लू रुग्ण संख्या वाढः 

17 ऑगस्ट 2022 रोजी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 350 झाली. ठाणे पालिका हद्दीमध्ये मागील तीन दिवसात 39 गुणांनी वाढ झाली तर रुग्णांची संख्या 291 वर गेली आहे. एवढंच नाही तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. मात्र आता हाच आकडा आठ वर गेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सहा रुग्णांची वाढ झाली, नवी मुंबईमध्ये 33 रुग्ण, मीरा-भाईंदर सहा, ठाणे ग्रामीण चार, बदलापूर आठ आणि अंबरनाथ मधील एका रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.