InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘जय श्रीराम म्हणायचं अन् वचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही’; मुख्यमंत्र्यांची फडणवीसांना कोपरखळी

- Advertisement -

शिवसेना नेहमीच हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला आपली ढाल करून लढली आहे. मात्र, 2019 च्या निवडणूक निकालानंतर हिंदुत्त्व विरोधी पक्षासोबत युती करून सत्तेत बसली आहे. त्यामुळे सामान्यांपासून सर्व पत्रकारदेखील शिवसेनेला हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सेक्युलिरीज आणि हिंदुत्त्वासंदर्भातील प्रश्नांची विचारणा करत आहेत. परंतु पहिल्यांदाच विधानसभेची पायरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि उपस्थितांनाही अतिशय योग्य शब्दात आपले उत्तर दिले आहे.

विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांच्या अभिनंदनाच्या ठरावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”आमचे हिंदुत्व कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील, पण आमच्या हिंदुत्वात शब्द पाळणं येतं. जय श्रीराम म्हणायचं अन् दिलेलं वचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही,” अशी कोपरखळीही उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावली.

Loading...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. अभिनंदन करतानाच त्यांनी निवडणूक निकालापासून भाजपबद्दल मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. फडणवीस यांचा त्यांनी मित्र म्हणून उल्लेख केला. समोर तुमच्यासारखे मित्र आहेत. हो! तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवून ठेवलेली नाही आणि त्यात अंतरही पडणार नाही, मी गेल्या पाच वर्षांत तुमच्याकडून खूप शिकलो,असे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.