T. Raja Singh | “शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे…”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल
T. Raja Singh | लातूर : तेलंगणा राज्यातील भाजपचे एकमेव आमदार टी. राजासिंग (T. Raja Singh) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी लातूर पोलिसांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप नोंदवला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीवेळी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता. विशेष म्हणजे, सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता कार्यालयाचा अभिप्राय आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Raja Singh controversial statement on Chhatrapati Shivaji Maharaj
शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमदार टी. राजासिंग यांनी भाषण केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, “हिंदू आणि मुस्लीम कधीच भाऊ-भाऊ होऊ शकत नाहीत. शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे भाऊ भाऊ-होऊ शकतात का? महाराणा प्रताप आणि अकबर भाऊ-भाऊ होऊ शकतात का? गायीची पूजा करणारा आणि गायीची हत्या करणारे भाऊ-भाऊ होऊ शकतात का? वंदे मातरम गाणारा आणि वंदे मातरम गाण्यास विरोध करणारा भाऊ-भाऊ होऊ शकतात का?” त्यांच्या याच वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
गुन्हा दाखल (FIR Filed)
“19 फेब्रुवारी रोजी लातुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीचा समारोप शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. तर याच समारोप कार्यक्रमात तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील गोशामहाल मतदारसंघाचे आमदार टी. राजासिंग यांनी भाषण केले होते.”
“टी. राजासिंग यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
आमदार टी. राजासिंग यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याचा आरोप करत विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर आमदार टी. राजासिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘चोर’मंडळ शब्दावरुन भाजप, शिवसेनेची हक्कभंगाची मागणी
- Sanjay Raut – हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका
- Sanjay Raut | भास्कर जाधव म्हणाले “100 बापाची औलाद नसशील तर आरोप सिद्ध कर” राऊत म्हणतात, “शाब्बास भास्करराव”
- Devendra Fadnavis | शेकापच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Bhaskar Jadhav | “मोहित कंबोज फडतूस माणूस”; कंबोज यांच्या आरोपानंतर भास्कर जाधव आक्रमक
Comments are closed.