T20 WC IND vs ENG Semi Final | भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल होणार? उद्या फैसला

T20 WC IND vs ENG Semi Final | भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून सुपर-12 मध्ये पराभूत झाल्यानंतर 2022 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानने नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली आणि आज न्यूझीलंडवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यापूर्वी पाकिस्तानने जे काही केले नव्हते ते सर्व सिडनी क्रिकेट मैदानावर पाहायला मिळाले.

पाकिस्तानने जबरदस्त गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षणात देखील करिष्मा केला, आतापर्यंतच्या कमकुवत दुव्या बाबर आझम (53) आणि मोहम्मद रिझवान (57) यांनी फटकेबाजी केली आणि पाकिस्तानने 7 गडी राखून  न्यूझीलंडवर  मात केली. पाकिस्तान तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता त्यांचा सामना 13 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे. यातील विजेता थेट पाकिस्तान संघाशी भिडणार. टीम इंडीयाने येथे विजयाची नोंद केली तर 2007 नंतर प्रथमच टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना चाहत्यांना पाहायला मिळेल. भारताने 2007 मध्ये पाकिस्तानला हरवून पहिला T20 विश्वचषक जिंकला होता.

टीम इंडिया 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी अॅडलेडच्या मैदानावर उतरणार आहे. दोन्ही संघ यापूर्वी T20 विश्वचषक विजेते ठरले आहेत. आयसीसी क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आणि इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 1 वाजता टॉस होईल.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.