T20 World Cup। पहिल्याच सामन्यात नामिबियाचा आशिया कप चॅम्पियन श्रीलंकेवर मोठा विजय

नवी दिल्ली : T20 विश्वचषक-2022 च्या सलामीच्या सामन्यात नामिबिया संघाने आशिया कप चॅम्पियन संघ श्रीलंका संघाचा पराभव केला. श्रीलंकेच्या संघाला 164 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकांत 108 धावांवर ऑल आउट झाला आणि सामना 55 धावांनी गमवावा लागला.

या सामन्यात 28 चेंडूत 44 धावा आणि 26 धावांत 2 बळी घेणाऱ्या फ्रायलिंकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मात्र श्रीलंकेची सुरुवात या विश्वचषक स्पर्धेत चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात सलामीवीर कुशल मेंडिस याला डेव्हिड वेसने कॅच आउट केले. श्रीलंकेचा संघ या धक्क्यातून सावरला नव्हता तोच लगेच चौथ्या षटकाच्या सलग दोन चेंडूंवर त्यांचे दोन फलंदाज पथुम निसांका आणि धनुष्का गुणतिलाका बाद झाले.

काही षटकांनंतर धनंजय डी सिल्वाही 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रीलंकेने 40 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर भानुका राजपक्षे आणि कर्णधार दासुन शनाका यांनी पाचव्या विकेटसाठी 24 चेंडूत 34 धावांची भागीदारी केली आणि काही प्रमाणात श्रीलंकेचा डाव रुळावर दिसला. पण, राजपक्षे 74 धावांवर बाद होताच ही जोडी फुटली.

यानंतर श्रीलंकेचे खालच्या फळीतील फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत आणि टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा संघ मोठ्या अपसेटचा बळी ठरला. मात्र या नामिबिया संघाचा या दणदणीत विजयानंतर आत्मविश्वास वाढलेला नक्कीच दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.