T20 World Cup | उद्या ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंना मिळणार ICC Hall of Fame सन्मान

टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) टी 20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) आता शेवटचे टप्प्याकडे वळली आहे. अशा परिस्थितीत आयसीसीने आज नवीन ‘हॉल ऑफ फेम’ (ICC Hall of Fame) ची घोषणा केली आहे. या यादीमध्ये तब्बल 109 नावे आहेत. आतापर्यंत 106 दिग्गज खेळाडूंनी हा आयसीसी हॉल ऑफ फेम पुरस्कार मिळवला आहे. तर मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी या यादीमध्ये 3 नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक इंग्लंड, एक पाकिस्तानी आणि एक वेस्ट इंडिज खेळाडूला स्थान मिळाले आहे.

हॉल ऑफ फेम या पुरस्काराच्या यादीमध्ये मंगळवारी तीन नवीन नावाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल, इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू शार्लोट एडवर्ड्स आणि पाकिस्तानचा माजी फिरकीपटू अब्दुल कादिर यांचा समावेश आहे. हे तीन दिग्गज खेळाडू हॉल ऑफ फेम पुरस्काराच्या यादीमध्ये अनुक्रमे 107,108 आणि 109 क्रमांकावर आहे.

आयसीसी हॉल ऑफ फेम हा पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असून त्यांनी क्रिकेटमध्ये आपले नाव अजरामर केले आहे. या तिन्ही व्यक्ती क्रिकेटमधील खूप महत्त्वाच्या व्यक्ती असून यांनी आपल्या संघासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड वर आयसीसी टी-20 विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीपूर्वी या दिग्गजांना हा सन्मान प्रदान करण्यात येईल.

आयसीसी चे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस म्हणले की, ” आयसीसी हॉल ऑफ फ्रेम हा पुरस्कार क्रिकेटच्या इतिहासातील नामांकित व्यक्तींना दिला जातो. या पुरस्काराद्वारे क्रिकेटपटूंच्या योगदानाचे कौतुक केले जाते. शिवनारायण, शार्लोट आणि अब्दुल यांनी क्रिकेटमध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाचे त्यांना या पुरस्काराच्या रूपात प्रमाणपत्र मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.