T20 World Cup | टी 20 वर्ल्ड कप फायनल हरल्यानंतरही पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना मिळाले करोडो रुपयांचे बक्षीस

टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये बाबर आझम (Babar Azam) च्या नेतृत्वाखाली पाकिस्तान (Pakisthan) संघाचा प्रवास अगदी नाट्यमय ठरला होता. कारण या स्पर्धेच्या सुपर 12 च्या टप्प्यातून पाकिस्तान संघ जवळपास बाद होणार होता. मात्र, संघाने अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. पण अंतिम फेरीमध्ये पोहचून देखील पाकिस्तानचे चॅम्पियन बनण्याची स्वप्न पूर्ण राहिले. तर दुसरीकडे फायनलमध्ये हरल्यानंतर ही पाकिस्तान संघातील खेळाडूंना कोटींचे बक्षीस मिळाले आहे.

आयसीसी (ICC) कडून पाकिस्तानला सुमारे दहा डॉलरचे बक्षीस मिळाले आहे. या रकमेमध्ये उपविजेता आणि सुपर 12 मधील सामना जिंकल्याबद्दलच्या बक्षीसाचा समावेश आहे. ही रक्कम पाकिस्तान चलनामध्ये रूपांतरित केली तर याची किंमत 22 कोटी 25 लाख रुपये इतकी होते. बक्षीस स्वरूपात मिळालेली ही रक्कम सतरा भागांमध्ये विभागली जाईल. यामध्ये सोळा भाग खेळाडूंना आणि एक भाग व्यवस्थापनाला मिळेल. खेळाडूंच्या भागांबद्दल अंदाज लावल्यास प्रत्येक खेळाडूला पाकिस्तानी चलनात सुमारे 30 लाख रुपये मिळतील.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेचा एकही सामना न खेळता ‘या’ खेळाडूंना मिळाली मोठी रक्कम

खुशदिल शहा आणि मोहम्मद हसनैन या दोन पाकिस्तान खेळातील खेळाडूंनी विश्वचषकाचा एकही सामना खेळला नाही. परंतु या दोघांना देखील बक्षीस स्वरूपात मिळणारी रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर फकर जमाननेही या स्पर्धेत एकच सामना खेळला होता परंतु त्यालाही मोठी रक्कम मिळणार आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आयसीसी कडून प्रतिदिन $ 144 (अंदाजे 9,500) भत्ता मिळत होता.

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी 20 विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरी पार पडली होती. यामध्ये दोन्हीही संघ दुसऱ्यांदा जेतेपद आपल्या नावावर करण्यासाठी लढत होते. दरम्यान, इंग्लंड संघाने यामध्ये बाजी मारून दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर केले.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.